Pune zilla Parishad येथे १ हजार पदांची भरती !!

Spread the love

Table of Contents

Pune zilla Parishad Bharti 2023

 पुणे जिल्हा परिषद भरती २०२३ : पुणे जिल्हा परिषद , (Pune zilla Parishad )यांनी जाहीर केलेल्या अधिसुचना आणि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे). पदासाठी १००० रिक्त जागांसाठी पदभरती सुरू आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात..अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२३.आहे. या पदांसाठी असणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कसा करावा यासंबंधीत सर्व माहिती भरतीवार्ता या वेबसाईटच्या खालील भागात दिली आहे……

Pune zilla Parishad Recruitment 2023

Pune zilla Parishad भरती संबंधित इतर माहिती:

पदाचे नाव: आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).
पदांची संख्या: १००० जागा
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Pharmacist (औषध निर्माता)औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदविका धारण करणारे आणि औषध शाळा अधिनियम 1948 खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार
Health workers (Male) (आरोग्य सेवक)विज्ञान विषय घेवुन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार.
Health workers (Female) (आरोग्य सेविका)ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेम नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील
Health Supervisor (आरोग्य पर्यवेक्षक)ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी धारण केलेली असेल आणि ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्याचा पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला असेल अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल.
Gram Sevak (ग्रामसेवक)किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता परीक्षेत किमान 60 % गुणांसह उत्तीर्ण किंवा शासन मान्य संस्थेची अभियंत्रिकी पदविका (तीन वर्षाचा अभ्यासक्रम) किंवा प्रशासन मान्य संस्थेची समाजकल्याणची पदवी (बी एस डब्ल्यु) किंवा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य अर्हता आणि कृषि पदविका दोन वर्षाचा अभ्यासक्रम
Junior Engineer (G.P.P.) (कनिष्ठ अभियंता)स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार
Junior Engineer (Mechanical) (कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी))यांत्रिकी अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार
Junior Engineer (Electrical) (कनिष्ठ अभियंता (विद्युत))विद्युतअभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार
Junior Engineer (Civil) (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य))स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार
Junior Engineer (Civil) (L.P.) (कनिष्ठ अभियंता (L.P.))स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार
Junior Draftsman (कनिष्ठ आरेखक)माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र
Junior Accounts Officer (कनिष्ठ लेखाधिकारी)ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केली असेल व कोणतेही सरकारी कार्यालय व्यापारी भागीदार संस्था अथवा स्थानिक प्राधिकरण यातील किमान 5 वर्षाचा अखंड सेवेचा ज्यांना अनुभव असेल अशा उमेदवारामधुन नामनिर्देशनाव्दारे नेमणुक करण्यात येईल. या बाबतीत लेखाशास्त्र आणि लेखा परीक्षा हे विशेष विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणान्यांना अथवा प्रथम वा व्दितीय वर्गातील पदवी धारण करणा-यांना अधिक पसंती दिली जाईल किंवा गणित अथवा सांख्यिकी अथवा लेखा शास्त्र व लेखा परिक्षा है। प्रमुख विषय घेऊन पदव्युत्तर पदवी धारण करीत असतील अशा | उमेदवारांमधुन नामनिर्देशनाव्दारे नेमणुक करण्यात येईल. याबाबतीत कोणत्याही सरकारी कार्यालयातील अथवा व्यापारी संस्थेतील अथवा स्थानिक प्राधीकरणातील लेखा कार्याचा अनुभव असणाऱ्यास अधिक पसंती दिली जाईल.
अर्ज पद्धती : ऑनलाईन अर्ज IBPS द्वारे
वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्षे
अर्ज शुल्क :
  • खुला वर्ग रु. १०००/- 
  • राखीव वर्ग : ९००/-
वेतनश्रेणी : रु. १९,९००/- रु. १,१२,४००/- पर्यंत
नोकरी ठिकाण : पुणे

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज सुरु होण्याची तारीख : ५ ऑगस्ट २०२३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : २५ ऑगस्ट २०२३.

अर्जदारांनी अर्ज कसा सादर करावा ?

  • हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जासाठी  https://ibpsonline.ibps.in/zpvpjun२३/ या अधिकृत वेबसाईट वर क्लिक करा. आणि नोंदणी करा
  • अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित सविस्तर माहिती pdf मध्ये दिलेली आहे.pdf डाऊनलोड या पर्यायावर क्लिक करा आणि pdf लक्षपूर्वक वाचा.
  • अर्ज नोंदणी करण्यासाठी, “नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा ” (Click here for New Registration) टॅब निवडा आणि नाव, संपर्क तपशील आणि ईमेल आयडी प्रविष्ट करा. प्रणालीद्वारे तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल आणि स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल. उमेदवाराने तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड नोंदवावा. तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड दर्शविणारा ईमेल आणि एस. एम. एस. देखील पाठविला जाईल.
  • जर उमेदवार एकाच वेळी अर्ज भरू शकत नसेल, तर तो “सेव्ह आणि नेक्स्ट” (Save & Next ) टॅब निवडून आधीच “एंटर” (Enter) केलेला डेटा जतन करू शकतो. ऑनलाइन अर्ज “सबमिट” (Submit) करण्यापूर्वी उमेदवारांना ऑनलाइन अर्जातील तपशीलांची पडताळणी करण्यासाठी “सेव्ह आणि नेक्स्ट” ” (Save & Next) सुविधेचा वापर करण्याचा सल्ला देण्यात येत आहे आणि आवश्यक असल्यास त्यात बदल करावा. दृष्टिहीन उमेदवारांनी अर्ज काळजीपूर्वक भरावा आणि अंतिम सबमिशन करण्यापूर्वी ते बरोबर असल्याची खात्री करण्यासाठी तपशीलांची पडताळणी करून घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाइन अर्जातील तपशील काळजीपूर्वक भरावेत आणि त्याची पडताळणी करावी, कारण “पूर्ण नोंदणी” (COMPLETE REGISTRATION BUTTON) बटणावर क्लिक केल्यानंतर कोणताही बदल शक्य होणार नाही/ करणे शक्य होणार नाही.

निवड प्रक्रिया कशी असेल ?

  • उमेदवाराचे नाव किंवा त्याचे/तिचे वडील/पती इ. चे नाव अर्जामध्ये बरोबर लिहिलेले असावे, जसे ते प्रमाणपत्र/गुणपत्रिका/ओळख पुराव्यामध्ये दिसते. कोणताही बदल / तफावत आढळल्यास उमेदवारी अपात्र ठरू शकते.
  • “तुमचे तपशील सत्यापित करा” (Validate your details) आणि “जतन करा आणि पुढील ” (Save & Next) बटणावर क्लिक करून तुमचा अर्ज जतन करा
  • फोटो आणि स्वाक्षरी स्कॅनिंग आणि अपलोड करण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये दिलेल्या वैशिष्ट्यांनुसार उमेदवाराने फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करण्याची कार्यवाही करावी.
  • नोंदणीपूर्वी संपूर्ण अर्जाचे पूर्वावलोकन आणि पडताळणी करण्यासाठी “पूर्वावलोकन ” (Preview) टॅबवर क्लिक करा.
  • आवश्यक असल्यास तपशील सुधारावा आणि छायाचित्र, स्वाक्षरी आणि इतर तपशील बरोबर असल्याची पडताळणी आणि खात्री केल्यानंतरच नोंदणी पूर्ण वर क्लिक करा (COMPLETE REGISTRATION).
  • “पेमेंट” (Payment) टॅबवर क्लिक करा आणि पेमेंटसाठी पुढे जावे व “सबमिट ” (Submit) बटणावरक्लिक करावे
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०२३ तत्पूर्वी अर्जदाराने अर्ज सादर करावे. अंतिम तारखेनंतर अर्ज केल्यास ते स्वीकारले जाणार नाहीत..

अधिकृत वेबसाईट


pdf डाऊनलोड


ऑनलाईन अर्ज


नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी whatsappलोगो वर क्लिक करा

नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी telegram लोगो वर क्लिक करा

अर्जदारांसाठी सूचना आणि निवेदन :

  • उमेदवार/ अर्जदाराला असे सूचित करण्यात येते कि, कोणताही अर्ज भरण्यापूर्वी संबंधित विभागाच्या प्रसिद्ध झालेल्या जाहिराती काळजीपूर्वक वाचाव्यात, अर्जाच्या अटी आणि बाबी समजून घेतल्यानंतर संबंधित पदासाठी अर्ज करावा….
  • भरतीवार्ता” ही रोजगार संबंधित वेबसाईट असून भरती विषयी कोणत्याही प्रकारचा शुल्क/ मोबदला घेत नाही, तसेच नोकरी लाऊन देण्यासंदर्भात आश्वासन करत नाही. इथे फक्त शासकीय भरती संदर्भात वेळोवेळी अपडेट केले जाते याची सर्वांनी नोंद घ्यावी
  • नोकरी आणि रोजगार संबंधित माहिती मिळवण्यासाठी Bharativarta.com या आपल्या अधिकृत वेबसाईटला दररोज भेट द्या. तसेच आपल्या गरजू मित्र आणि मैत्रिणींना ही माहिती शेअर करा….
  • नोकरी संबंधित अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegramme ग्रुपला जॉईन व्हा….